शेतकऱ्यांसाठी निर्यातीची संधी

                             
            आज भारतातील अनेक शेतकरी बाजार भावा अभावी आत्महत्या करत आहेत, कारण शेतमालाला नसलेला भाव, शेतकऱ्यावरील कर्ज अशा अनेक कारणामुळे आजचा शेतकरी हा या दिशेने पावले उचलत आहे, मात्र शेतकऱ्यांना अजूनही शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आत्मसात करता आला नाही. काही शेतकरी मात्र विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. आज शेतकऱ्यांना या करोना रोगाच्या प्रभावातून पुढे सरसावणे खूप कठीण होणार आहे, आज देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा खूप मोठा आहे, पण आज अजूनही शेतकरी 21व्या शतकात 21व्या शतकाप्रमाणे त्याची वाटचाल झालेली आपणास दिसून येत नाही, आज खूप काही उद्योग शेतकऱ्यांना शेती करताना जोडधंदा म्हणून आपल्या देशात असताना शेतकरी मात्र यापासून खूप दूर आहे,
                      कधी कधी बाजार भावा अभावी शेतकऱ्यांना आपला माल असाच शेतात फेकून द्यावा लागतो. उदा. कांदा, कांदा ज्यावेळेस 5 रुपये किलो असतो त्यावेळेस शेतकऱ्यास त्या कांद्याला झालेला खर्च ही भरून निघणं खूप अवघड होऊन बसत अश्या वेळेस शेतकरी निराश होऊन जातो आणि आपला सर्व माल आपल्या शेतात गाडून टाकतो, मालाला भाव नसल्या कारणांमुळे खर्चही वसूल न झाल्याने तो सर्व माल आपल्या शेतीला दान करतो. मात्र अश्या वेळी जर याच कांद्यावर प्रक्रिया करून त्याची कांदा पावडर तयार केल्यास तीच कांदा पावडर 150रु ते 200 रु किलो याप्रमाणे बाजारात विकली जात असते. पण याविषयी मात्र शेतकऱ्याला कोणतीच कल्पना नाही.
                         अजून बऱ्याच संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत, मात्र या माहितीच्या अभावाने शेतकरी अजूनही खूप काही मागे आहे.  शेतमालाची निर्यात ही शेतकऱ्यांसाठी ची खूप मोठी आज जगाच्या व्यापारात असलेली दिसून येईल, पण याविषयीची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहच नसल्याने त्याला या व्यवसायाची संधी किती मोठ्या प्रमाणात जगात उपलब्ध आहे याची जाणीव नाही, आज शेतकरी मोठा झाल्यास देशाला 5 ट्रीलियन अर्थव्यवथा होणं काही अवघड नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सवय खूप काही शिकवून जाते

How many export product in the world